मुंबई : येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याच्या प्रतीक्षेत देश आहे. आयोध्येत Mumbai to Ayodhya देखील जयत तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रातून आयोध्येपर्यंत जाण्यासाठी मराठी भक्तांना मोठा प्रवास करावा लागणार आहे. परंतु आता तुम्ही जर अयोध्येला Mumbai to Ayodhya जाण्याची तयारी करत असाल तर एक चांगली बातमी तुमच्यासाठी आहे. जी तुमचा वेळ नक्कीच वाचवणार आहे. दिल्लीनंतर आता मुंबईतून देखील अयोध्येसाठी फ्लाईट घेता येणार आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने मुंबई आयोध्या फ्लाईट मार्ग तयार करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणासाठी जय्यत तयारी करत आहेत. हजारोंच्या संख्येने भाविक प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मंदिरात उपस्थित असण्याची शक्यता आहे. तसेच मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर देशातून प्रत्येक हिंदू हा नक्कीच प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी आयोध्याकडे जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आता या फ्लाईट मुळे महाराष्ट्रातील भाविकांचा वेळ नक्कीच वाचणार आहे. येत्या सहा जानेवारीपासून ही मुंबई आयोध्या सेवा इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.