जालना : जालन्यातील Jalana अंतरवाली सराटीमध्ये Antarvali Sarati मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला Maratha Reservation सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या या आमरण उपोषणाला गावात परवानगी देऊ नये असं निवेदन अंतरवली सराटीतील काही ग्रामस्थांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे अशी माहिती मिळते आहे. आणि या निवेदनाच्या आधारेच आता पोलिसांनी त्यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
मनोज जरांगे पाटील हे आता परवानगी नाकारली गेल्यामुळे संतापले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ क ?”, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला प्रचंड धक्का बसला आहे. महायुतीची जी काही हानी महाराष्ट्रामध्ये झाली त्याला मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन हा मोठा फॅक्टर जबाबदार धरला जातो आहे. अद्याप देखील मराठा आरक्षण यावर प्रशासनाने ठोस पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हे आमरण उपोषण सुरू करणार असं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज अंतरवली सराटीमध्ये त्यांचं आमरण उपोषण सुरू होणार होतं. परवानगी नसली तरीही मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. ते म्हणाले की , ” मी लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला आहे. आता शांतता आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. आंतरवालीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन जाणीवपूर्वक आहे. मग उद्या तुमच्या यात्रा निघतील, तेव्हा आम्हीही निवेदन देऊ. यात्रेमुळे रस्त्यावर रहदारीला त्रास होतो, विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे, यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होईल, असे आम्हीही निवेदनात सांगू. मग पोलीस त्या यात्रा रद्द करणार का, असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला. मला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी समाज बांधवांनी येऊ नये. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या लढ्यासाठी मी खंबीर आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक ,गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आहे. याठिकाणी काही झालंच तर याला जबाबदार निवेदन देणारेच असतील,” असा थेट इशारा देखील त्यांनी दिला आहे.