उत्तराखंड : उत्तराखंड मधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. या अपघातामध्ये बसमधील बारा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाखा बदाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असून बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तराखंड मधील बद्रीनाथ महामार्गावर या मिनी बस ट्रॅव्हलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं, आणि ही मिनी बस थेट अलकनंदा नदीमध्ये कोसळली आहे. अद्याप देखील मदत कार्य सुरू आहे.