मुंबई : मुंबईतून हार्बर रेल्वेबाबत Harbour line एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. लोकलचा डबा आज पुन्हा एकदा घसरला आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणींमध्ये आज पुन्हा एकदा वाढ होणार आहे.
सोमवारीच हार्बर लाइनवर लोकलचा एक डबा घसरला होता. या ठिकाणी दुरुस्ती देखील करण्यात आली होती. पण आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लोकलचा रिकामा डबा घसरला आहे. या अपघाताने हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Ramdas Athavale : ” नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… ! ” रामदास आठवलेंची कविता
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर आता वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली असून जोपर्यंत अपघात झालेला लोकलचा हा डबा पुन्हा रुळावर आणला जात नाही तोपर्यंत ही वाहतूक बंद असेल अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.










