मणिपूर : मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग Chief Minister N Biren Singh यांच्या सुरक्षा ताब्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एक सुरक्षारक्षक जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे.
मुळातच मणिपूरमधील वातावरण हे खदखदते आहे. त्यात आता थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला झाल्यामुळे वातावरण प्रचंड दहशतीचे बनले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यावर मणिपूरच्या हिंसाचार ग्रस्त जिरीबाम जिल्ह्यामध्ये हा हल्ला झाला आहे. ताफ्यावर अचानक अनेक राउंड फायर करण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर केले आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांवरील हा हल्ला म्हणजे मणिपूरच्या लोकांवरील थेट हल्ला असल्याचं समजलं जाईल त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एनबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या जिबिराम जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या भागामध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या घटनेमध्ये सत्तरहून अधिक घरांना देखील आग लागली असल्याची माहिती मिळते आहे.