नवी दिल्ली : भारतामध्ये गुगल पे Google Pay सारखे ॲप वापरणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. अगदी दहा रुपयांच्या पेमेंट पासून ते हजारो रुपयांचे पेमेंट्स गुगल पेच्या द्वारे केले जातात. तुम्ही देखील गुगल पे वापरत असाल तर ही बातमी वाचा. आर्थिक व्यवहारांसाठी भारतामध्ये गुगल पे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. गुगल पे हे ॲप दुसऱ्या क्रमांकावर आहे. असं असताना हे ॲप आता बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
अर्थात भारतामध्ये हे ॲप बंद होणार नाही अशी स्पष्ट की गुगलने दिली आहे. तर चार जून पासून गुगल पे हे ॲप अमेरिकेमध्ये बंद करण्यात आले आहे.
नेमकं कारण काय
अमेरिकेमध्ये गुगलने गुगल पे हे ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जात असून ऑनलाइन पेमेंट आणखी सोपं व्हावं यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच गुगल पे बंद करण्यात आले असल्याच सांगण्यात आलं आहे. परंतु भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतामध्ये गुगल पे वरून व्यवहार करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या ॲपची सुविधा भारतात चालू राहणार असल्याचा देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.