PB Vs KT : MPLचा पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या दोन संघामध्ये झाला. ऋतुराज गायकवाडने MPL 2023 च्या पहिल्या पर्वातील पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकलंय.कोल्हापूर टस्कर्सने पुणेरी बाप्पाला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. पुणेरी बाप्पाने विजय मिळवून पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली.
पुणे : MPL 2023 ला सुरूवात झालीये. MPLचा पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या दोन संघामध्ये झाला. पुणेरी बाप्पाने(PB) टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर झाला. पुणेरी बाप्पाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करतोय तर दुसरीकडे, कोल्हापूर टस्कर्सचे नेतृत्व केदार जाधव करतोय. पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्सने विजय मिळवलायं. ऋतुराज गायकवाडने MPL 2023 च्या पहिल्या पर्वातील पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकलंय.कोल्हापूर टस्कर्सने पुणेरी बाप्पाला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. पुणेरी बाप्पाने विजय मिळवून पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्या मार्गदर्शनाखाली MPL 2023 खेळवली जात आहे.
https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2Fmpltournament%2Fstatus%2F1669401934157971456&widget=Tweet
ऋतुराजने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला
ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह यांनी दणक्यात सुरुवात केली. 10 षटकात दोघांनी 110 धावांची सलामी दिली. या जोडीपुढे कोल्हापूरचे गोलंदाज कमी पडले होते. ऋतुराज गायकवाडने 27 चेंडूत वादळी 64 धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराज गायकवाडने पाच चौकार आणि पाच षटकार ठोकले. तर पवन शाह याने 48 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर सुरज शिंदे आणि यश क्षिरसागर यांनी पुण्याला विजय मिळवून दिला. सुरज शिंदे याने 11 धावांची खेळी केली.कोल्हापूरकडून श्रेयस चव्हाण आणि तरणजीत सिंह यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
पुणेरी बाप्पा संघ (Puneri Bappa Playing 11)
सूरज शिंदे, ऋतुराज गायकवाड (Captain), दिग्विजय पाटील (Wise Captain), हर्ष संघवी, पवन शहा, अभिमन्यू जाधव, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, श्रीपाद निंबाळकर, सचिन भोसले, आदर्श बोतारा.
कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers Playing 11)
केएम जाधव (Captain), साहिल औताडे (Wicketkeeper), एआर बावणे, सचिन धस, एनएस शेख, ए.ए. दरेकर, तरनजीत सिंग, निहाल तुसामद, सिद्धार्थ म्हात्रे, कीर्तीराज वाडेकर, रवी चौधरी.
पिच अहवाल
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा पुण्याचा पृष्ठभाग सहसा फलंदाजीसाठी खूप चांगला असतो आणि वेगवान गोलंदाजांना काही मदत होईल. दोन्ही संघ या ठिकाणी पाठलाग करण्यास प्राधान्य देतील.
MPL 2023 तारीख आणि वेळ
T20 स्पर्धा 15 जूनपासून सुरू होईल आणि MPL 2023 चा अंतिम सामना 29 जून रोजी होईल.
MPL 2023 संघ
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारे सहा संघ येथे आहेत.
पुणेरी बाप्पा
ईगल नाशिक टायटन्स
कोल्हापूर टस्कर्स
छत्रपती संभाजी राजे
रत्नागिरी जेट्स
सोलापूर रॉयल्स
MPL 2023 वेळापत्रक (MPL 2023 Schedule)
15-जून-२३ – पुणेरी बाप्पा वि कोल्हापूर टस्कर – 8:00 PM
16-जून-23 – ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्ज – 2:00 PM
16-जून-23 – रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स – 8:00 PM
17-जून-23 – कोल्हापूर टस्कर्स वि रत्नागिरी जेट्स – 8:00 PM
18-जून-23 – ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स – 2:00 PM
18-जून-23 – पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी राजे – 8:00 PM
19-जून-23 – पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स – 8:00 PM
20-जून-23 – सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स – 2:00 PM
20-जून-23 – रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी राजे – 8:00 PM
21-जून-23 – ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स – 8:00 PM
22-जून-23 – छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स – 2:00 PM
22-जून-23 – पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स – 8:00 PM
23-जून-23 – सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी राजे – 8:00 PM
24-जून-23 – पुणेरी बाप्पा विरूद्ध रत्नागिरी जेट्स – 2:00 PM
24-जून-23 – कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स – 8:00 PM
26-जून-23 – क्वालिफर 1 – 8:00 PM
27-जून-23 – एलिमिनेटर – 8:00 PM
28-जून-23 – क्वालिफ 2 8:00 PM
29-जून-23 – फायनल – 8:00 PM