Legends Cricket League 2023 : लीजेंड्स क्रिकेट लीग 2023 Legends Cricket League 2023 च्या एका सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर Former cricketer Gautam Gambhir आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांत Former fast bowler S Sreesanth यांच्यात संघर्ष झाला होता. काल ६ डिसेंबर रोजी सुरत येथे इंडिया कॅपिटल्स India Capitals आणि गुजरात जायंट्स Gujarat Giants यांच्यात सामना झाला. हा सामना इंडिया कॅपिटल्सने १२ धावांनी सामना जिंकला. एलएलसी २०२३ च्या या सामन्यात गंभीर आणि श्रीशांत यांच्यात वाद झाला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल The video goes viral होत आहे, ज्यात दोन्ही भारतीय खेळाडू मध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.
दरम्यान, श्रीशांत आपल्या एक्सवर एक व्हिडिओ शेअर करून गंभीरसाठी आपले विरोधी मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, गंभीरने असे काही म्हटले जे त्याने वरिष्ठ खेळाडू म्हणून करायला नको होते. व्हिडिओ दरम्यान त्याने गंभीरला मिस्टर फायटर देखील म्हटले होते.
भांडणानंतर एस. श्रीशांतची गौतम गंभीरवर टीका
खरं तर, श्रीसंतने एक व्हिडिओ जारी करत गौतम गंभीरवर टीका केली. ” मिस्टर फायटरसोबत जे घडले त्याबद्दल मला फक्त स्पष्टीकरण द्यायचे होते. तो नेहमीच आपल्या सर्व सहकारी खेळाडूंशी भांडतो, तोही कोणत्याही कारणाशिवाय. वीरू भाईंसह अनेक वरिष्ठ खेळाडूंचा ही तो आदर करत नाही. नेमकं तेच आज घडलं. तो मला वारंवार चिथावणी देत होता, तो मला असे काही तरी सांगत होता जे अत्यंत अशोभनीय होते, जे गंभीरने करायला नको होते.”
https://www.instagram.com/p/C0hQBq8MgA4/?utm_source=ig_web_copy_link
श्रीशांत पुढे म्हणाला, “इथे माझी काही चूक नव्हती. मला हे अगदी स्पष्ट करायचे आहे. गौतम यांनी जे केले आहे, ते लवकरच तुम्हा सर्वांना कळेल, त्यांनी वापरलेले शब्द आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर मान्य नाहीत. माझं कुटुंब, माझं राज्य, सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. ही लढाई मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने लढली. आता लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे. ज्या गोष्टी त्यांनी बोलायला नको होत्या, त्या त्यांनी बोलल्या. तो काय म्हणाला ते मी नक्की सांगेन. ”