मुंबई : शिवसेना Shivsena पक्षातून एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी बंड पुकारले आणि भाजपमध्ये BJP सामील होऊन नव्याने सत्ता स्थापन केली. यानंतर मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि शिंदेंच्या समर्थनात असणारे काही आमदार MLA देखील मंत्रीपदावर विराजमान झाले. सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न डोकंवर काढून आहेत. यामध्ये अवकाळी पावसाने झालेलं नुकसान, प्रदूषणाची वाढती पातळी, मराठा आरक्षण, धनगर आणि आदिवासी आरक्षण अशा अनेक प्रश्नांमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातील मंत्र्यांबाबत आमदारांनी थेट तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील या बिकट प्रश्नांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरू असतानाच काही आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. वारंवार सांगून देखील आमची काम होत नाहीत. अशी तक्रार काही आमदारांनी केली आहे.
राजकारणातील सध्याच्या खलबतीनुसार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्याबाबत आमदार नाराज असल्याचं बोलले जाते आहे. त्याचबरोबर इतर कोणत्या मंत्र्यांबाबत आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे ते लवकरच उघड होईल. दरम्यान काही राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या देखील जोरदार हालचाली सुरू होणार आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर नेमकी कुणाची बाजू घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.