मुंबई : महाडमध्ये चवदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी आज मनुस्मृतीचे दहन केलं. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने प्रस्ताव मांडला असून यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक होत थेट मनुस्मृतीचे आज दहन केलं.
दरम्यान या आंदोलनामध्ये अनेकांनी मनुस्मृति बरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील फोटो सोबत आणले होते. या आंदोलनाच्या नादात मनुस्मृतीचा निषेध करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील फोटो फाडण्यात आले आहे.
या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना म्हटले आहे की, ” ही एक अक्षम्य चूक असून गंभीर दखल देशानेही घेतली आहे. या घटनेचा प्रथम निषेध करतो आणि ज्या जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य करून राष्ट्राचा अवमान केला आहे, त्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ” अशी थेट मागणी आज माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी केली आहे.
मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका
मिटकरी म्हणाले की, 24 तासांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली नाही किंवा महाडच्या डॉ. बाबासाहेबांच्या बोटावर नाक घासूनप्रायश्चित्त घेतले नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.