नवी दिल्ली : एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. देशात लोकसभा निवडणुका Lok Sabha Election 2024 पार पडल्या असून आता निकाल हाती आले आहेत. एनडीए सरकारने बहुमत मिळवून रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी सात वाजता नरेंद्र मोदी Narendra Modi तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल Praful Patel यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला असून उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांना देखील मंत्रीपद मिळू शकते. परंतु या माहितीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
Manoj Jarange Patil : मी मोदींना शपथ घेऊ नये असे निवेदन देऊ का ? जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला गावातूनच विरोध ! नेमकं काय घडतंय Video
त्यासह शिंदे गटातील संदिपान भुमरे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांना देखील मंत्रिमंडळात जागा मिळू शकते अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
Video : कोल्हापुरी झणझणीत टोमणा ! ” सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलय कुठे ? कोल्हापूरच्या चौकात झळकला बॅनर ! चर्चा तर होणारचं