बीड : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Elections लागलेला निकाल हा भाजपसाठी BJP पचवणे जड गेले आहे. महाराष्ट्रातील जवळपास निश्चित समजल्या जाणाऱ्या काही जागा भाजपच्या हातून निसटल्या आहेत. त्यापैकी एक आहे बीड लोकसभा मतदारसंघाची जागा…! बीडमध्ये महायुतीच्या वतीने भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाच्या बजरंग सोनावणे Bajarang Sonavane यांनी निवडणूक लढवली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये सहा हजाराच्या फरकाने बजरंग सोनावणे हे विजयी ठरले आहेत.
या निकालानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण हे अत्यंत ढवळले गेले आहे. काल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करून महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्हीही कडच्या कार्यकर्त्यांनी हे आता थांबवलं पाहिजे अशी विनंती केली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, ‘क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै’ स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे, असा धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
मतदानाच्या दिवशी काही जणांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला होता की ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर येऊन रिवाल्वर हातात घेतली तसेच एकास मारहाण देखील केली. याबाबत देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले की, ” मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे, 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवायची शिकवण दिली, आज त्या शिकवणी पासून परावृत्त न होता, आपला गावगाडा व आपली सामाजिक एकतेची परंपरा अबाधित ठेवणे हे सर्व जिल्हावासfयांचे आद्य कर्तव्य आहे. ” असे धनंजय मुंडे यांनी या विडिओमध्ये म्हटले आहे.