अहमदनगर : अहमदनगरची लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली. त्यानंतर मतदान केलेली EVM हे अहमदनगरमधील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तेथे थ्री लेयर सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता ही सुरक्षा भेदून स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला.
अहमदनगरची लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली. त्यानंतर मतदान केलेली EVM हे अहमदनगरमधील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तेथे थ्री लेयर सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता ही सुरक्षा भेदून स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला होता. त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओचा ट्विट केला होता. दरम्यान आता याबाबत माहिती समोर आली आहे. ती अशी की, या व्हिडीओ मध्ये दिसणारा व्यक्ती हा कोणतीही छेडछाड करण्यासाठी गेला नव्हता. तो अधिकृत व्यक्ती होता अशी माहिती समोर येत आहे.
या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा कोणतीही छेडछाड करण्यासाठी गेला नव्हता.व्हिडिओमध्ये दिसणारा जो कर्मचारी आहे तो अधिकृत कर्मचारी आहे. तांत्रिक दुरुस्ती व देखभालीसाठी गेलेला माणूस हा रजिस्टरला रीतसर नोंद करून गेलेला होता. पोलिसांना सोबत घेऊन तो आत गेलेला होता व काही मिनिटात तांत्रिक दुरुस्ती करून तो बाहेर आलेला होता. कोणताही अनधिकृत व्यक्ती आतमध्ये गेलेला नाही असे प्रशासनाने सांगितले असल्याचे एका मीडियाने वृत्त दिले आहे.
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी काल रात्री एक इसम थेट त्रिस्तरीय सुरक्षा भेदून शटरपर्यंत पोहोचला व CCTV मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निलेश लंके म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, हा प्रयत्न माझ्या सहकाऱ्याने लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात तर मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खात असून लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.