अहमदनगर : येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे Lok Sabha Election 2024 निकाल हाती लागणार आहेत सर्वच उमेदवारांची धाकधूक एकीकडे वाढली असतानाच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके Nilesh Lanke यांनी आपण दोन लाखाच्या फरकाने निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यात आणि देशात सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढलेली असताना आज एक्झिट पोल घोषित करण्यात आला आहे. दरम्यान अहमदनगरमधून उमेदवार निलेश लंके यांनी आपल्या विजयाबाबत भाकीत केले आहे. ते म्हणाले की, ” मला शंभर टक्के विश्वास आहे की निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.
दरम्यान अहमदनगर मधून महाविकास आघाडीच्यावतीने निलेश लंके यांच्याविरुद्ध महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यामध्ये लढत झाली आहे. सुजय विखे यांच्यासाठी ही एक प्रतिष्ठेची लढत असून निलेश लंकेने देखील त्यांना तगड आव्हान उभं केला आहे.