मुंबई : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात उपस्थित राहून शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
शहाजी बापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपस्थित राहून शहाजी बापू पाटील यांची विचारपूस करताना म्हणाले की, ” शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पुन्हा एकदा धडाडावी. ही तोफ बिछान्यावर पडून नव्हे तर भर सभेत विरोधकांना चारही मुंड्या चित करताना दिसायला हवी. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या आणि लवकर बरे व्हा अशा सदिच्छा दिल्या आहेत.