नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल देशभरातून समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार 400 पार चा नारा दिला होता. ते चारसो पार होऊ शकले नसले तरीही एनडीएने बहुमत मिळवून देशात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. येत्या आठ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान Naredra Modi पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 जूनला संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान राजकीय हालचालींना वेग आला असून आज दुपारी चार वाजता दिल्लीमध्ये एनडीएची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये जेडीयु प्रमुख नितेश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान मित्र पक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची देखील बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ जूनला पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. देशातील पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेणारे ते दुसरे नेते होणार आहेत. याआधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा मान मिळवला होता.