मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला अक्षरशः एक अंकी जागा जिंकता आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अहमदनगर, अमरावती, बीड, जालना या जागा खरंतर जवळपास निश्चित मानलया जात होत्या. पण जो निकाल भाजपला BJP पहावा लागलाय तो नक्कीच अत्यंत धक्कादायक आहे.
https://www.facebook.com/share/v/nCURp97X97z45GGY/?mibextid=xfxF2i
महाराष्ट्रातून सर्वच जण याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis नेमकं काय म्हणतात याचीच वाट पाहत होते. पण या निवडणूक निकालानंतर जे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला एवढ्या कमी जागांवर समाधान का मानावं लागलं? याची नेमकी कारण देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत. ते म्हणाले की, मराठा आरक्षण, शेतीमालास भाव आणि संविधान बदलणार असल्याचा जो काही प्रकार केला गेला त्याचा फटका भाजपला बसला. असा स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल आहे.