महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली असून नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर शिरूर मध्ये सर्वात कमी मतदान पार पडले आहे.
आज महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52.49% मतदान पार पडले आहे.
Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे
नंदुरबार – ६०.६०
जळगाव – ५१.९८
रावेर – ५५.३६
जालना – ५८.८५
औरंगाबाद – ५४.०२
मावळ – ४६.०३
पुणे – ४४.९०
शिरूर – ४३.८९
अहमदनगर – ५३.२७
शिर्डी – ५२.२७
बीड – ५८.२१
- पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
- बीड – पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
- शिरुर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ( राष्ट्रवादी)
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – संदिपान भुमरे ( शिवसेना), चंद्रकांत खैरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
- जालना – रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
- अहमदनगर – सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
- मावळ – श्रीरंग बारणे ( शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
- शिर्डी – सदाशिव लोखंडे ( शिवसेना ), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
- रावेर – रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
- जळगाव – स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
- नंदुरबार – हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)