मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर देशात आणि महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील निवडणुका 20 मे रोजी पार पडणार आहेत. मुंबईमध्ये Mumbai ६ लोकसभा मतदार संघात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
20 मे रोजी बृहन्मुंबई शहरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला चुकूनही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबई पोलीस दलाकडून ५ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उपायुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त त्याचबरोबर 2,475 पोलीस अधिकारी आणि तब्बल 22 हजार 100 पोलीस अंमलदार यासह तीन दंगल काबू पथक तैनात करण्यात आली आहेत.
मुंबईतील महत्त्वाच्या सहा लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मुंबईसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.