बारामती : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रामध्ये अनेक लढती या खास आहेत. यापैकी एक लढत आहे बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार… खरंतर ही केवळ राजकीय लढत नसून प्रतिष्ठेची अशी कौटुंबिक लढत देखील होणार आहे. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून महादेव जानकर यांनी आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना जिव्हारी लागेल असा सल्ला दिला आहे.
आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघाती टीका करताना म्हटले आहे की, ” सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय ! ” अशी बोचरी टीका राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जाणकर यांनी केली आहे.
Breaking News : सांगलीत भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरच करावं लागलं Emergency Landing; अतिउत्साही तरुणांना शांत करण्यासाठी लष्कराच्या जवानांनी केलं असं काही…
तसेच महादेव जाणकार म्हणाले कि, ” मी मंत्री होतो तेंव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेस सरकारने अश्या योजना कधी लागू केल्या, अस सवाल त्यांनी विचारला. उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे, आदिसांच्या 22 योजना धनगर समाजाला द्याव्या ही मी मागणी मोदींना करणार असे ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर म्हणता आणि धनगर समाजाला व्हॉईस चेअरमन करता. ओबीसींना घटनात्मक दर्जा देण्याच काम मोदी सरकारने केलं. धनगर समाजासाठी आम्ही सक्षम आहोत, आम्ही त्या क्याडरचे लिडर आहोत, ” असे देखील ते म्हणाले आहेत.