जालौन : प्रत्येक मुलगा, पती, बाप हा केवळ आपल्या कुटुंबासाठी परिश्रम करून पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो. पण पैसा कमावण्याच्या नादात जर कुटुंबालाच वेळ देता आला नाही आणि त्यामुळे कुटुंब जर जिवंत राहू शकले नाही तर अशा नोकरीचा काय उपयोग ? असा विचार करायला भाग पाडेल अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रामपुरा परिसरामध्ये….
झालं असं की, रामपुरा पोलीस स्थानकामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस शिपायाने आपल्या गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी महिन्याभरापासून पोलीस अधिकारी यांना सुट्टीचा अर्ज केला होता. चार वेळा अर्ज करून देखील सुट्टी मिळाली नाही. यामुळे हा पोलीस कॉन्स्टेबल अत्यंत विचित्र मनस्थिती मध्ये होता. अशातच उपचार न मिळाल्यामुळे त्याची पत्नी आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी त्याला समजली आणि त्याने अक्षरशः टाहो फोडला हा धक्का पचवताना आल्याने तो बेशुद्ध झाला.
Breaking News : सांगलीत भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरच करावं लागलं Emergency Landing; अतिउत्साही तरुणांना शांत करण्यासाठी लष्कराच्या जवानांनी केलं असं काही…
त्याच्यावर आलेली ही परिस्थिती पाहून मग कुठेतरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी पोलिसांच्या जीपमधून त्याला गावी नेलं. पण या धक्क्यातून तो सावरू शकला नाही. पोलीस विभागाने या घटनेनंतर आता विकासला महिन्याभराची सुट्टी दिली आहे. पण आता या सुट्टीचा कोणताही उपयोग होणार नाही आणि या पोलीस शिपायाची पत्नी आणि नवजात बालकाला परत आणता देखील येणार नाही. या घटनेनंतर या पोलीस शिपायांन सोशल मीडियावर देखील एक पोस्ट केली आहे. आणि आपल्या पत्नीची आणि बाळाची माफी मागितली आहे. या घटनेने परिसरातील नागरिक आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास याच्यासोबत काम करणाऱ्या सहकार्याने देखील हळहळ व्यक्त केली आहे.