नवी दिल्ली : नवीन वर्षात 14 जानेवारीपासून काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ India Justice Journey सुरू होणार आहे. 24 मार्च पर्यंत संपूर्ण भारत भ्रमण या यंत्राच्या माध्यमातून काँग्रेस च्या वतीनें केले जाणार आहे. या न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेला आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
कशी असणार आहे भारत न्याय यात्रा ?
- भारत न्याय यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होऊन ती 20 मार्च पर्यंत भारत भ्रमण करणार आहे.
- भारत न्याय यात्रा ही तब्बल सहा हजार दोनशे किलोमीटर अंतर कापणार आहे. या दरम्यान देशभरातील प्रत्येक समाज घटकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- हा प्रवास 14 जानेवारीला मणिपूर ते मुंबई असा ठरवण्यात आला आहे.
- या भारत न्याय यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते श्री गणेशा केला जाणार आहे. परंतु मागील वर्षी प्रमाणे स्वतः राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करणार का ? याबाबत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.
- भारत न्याय यात्रा 14 राज्यांमधून जाणार असून यापैकी 85 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये मणिपूर पासून सुरुवात करण्यात आली असून पुढे नागालँड, आसाम ,मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उडीसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि शेवट महाराष्ट्रमध्ये करण्यात येणार आहे.
दरम्यान येत्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ अशी भूमिका यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.