वर्धा : मराठा समाजाला Maratha Community सरसकट ओबीसी OBC मधून आरक्षण Reservation देण्यात यावं यासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील हे पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे देखील ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. दोघांमध्येही सातत्याने शाब्दिक बाचाबाची होत असताना आजच्या ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आज वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या ओबीसी मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे उपस्थितांना संबोधित करणार होते. मात्र अचानक प्रकृती व्यवस्थित नाही असे कारण देऊन या सभेला मंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारली. परंतु खरं कारण वेगळंच असल्याचं बोललं जात आहे.
म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी सभेला मारली दांडी
आज वर्धामध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ओबीसी मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे उपस्थितांना संबोधित करणार होते. परंतु प्रकृती व्यवस्थित नसल्याच्या कारणाने ते आले नाहीत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेला गर्दी झाली नसल्याकारणामुळे छगन भुजबळ यांनी या सभेला येण्याचे टाळलं असल्याचं बोललं जात आहे.
अपेक्षेनुसार वीस ते पंचवीस हजार ओबीसी समाज या सभेसाठी उपस्थित राहतील असा आयोजकांनी अंदाज दिला होता. तरीही प्रत्यक्षात मात्र 1000 सुद्धा ओबीसी समाज बांधव या सभेला हजर नसल्याचे दिसून आल आहे. त्यामुळेच छगन भुजबळ यांनी या सभेला येण्याचं टाळलं असल्याचं बोललं जात आहे.