नागपूर : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन Winter Session सुरू आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक किचकट मुद्द्यांवर चर्चा आणि तोडगा काढण्याचे काम सुरू असताना आज अधिवेशनास सुट्टी आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांचा खास लुक पाहायला मिळाला.
हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच मोठे नेते हे सध्या नागपूर मध्ये आहेत. दरम्यान नागपूर मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर मेट्रोला भेट दिली. नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी संपूर्ण मेट्रो प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली आहे. तरी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेहमी पेक्षा खास लुक पाहायला मिळाला.
आज त्यांनी चेक्सचा डार्क निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट परिधान केलेला या फोटोमध्ये दिसतो आहे. तर मोठा गॉगल देखील त्यांनी लावला आहे. त्यांचा आजचा खास लुक देखील लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.