मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय नेते हे एकमेकांवर टीका करताना सर्रासपणे शब्दांची आणि वाक्यांची पातळी सोडताना दिसून येत आहे. राजकारणाची पातळी देखील खालावली आहे. दरम्यान कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे एक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्यांनी टीकाटिप्पणी देखील केलीच आहे. धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे Udhhav Thackrey यांच्यावर टीका करताना म्हटले की, ” कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते हे देशाला माहिती आहे. आम्ही काही काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येत आम्हाला तोंड उघडायला लावू नका…!” अशी टीका त्यांनी केली होती.
दरम्यान या टिकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं. परंतु हिंगोलीतील शेतकरी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. परंतु त्यांना अटक करण्यात आले. आपली कर्ज फेडण्यासाठी याच शेतकऱ्यांनी अखेर आपल्या अवयवांची निलामी करण्याची आहे अशी व्यथा या शेतकऱ्यांची झाली असताना आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आज ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पोलिसांना भेटून चौकशी केली. त्यानंतर या शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी बोलावलं.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हे वाचलेत का ? PUNE CRIME : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या; गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, पोलीस आयुक्तांना आदेश
या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की आज आपली पत्रकार परिषद ठरली नव्हती संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो हे कुठे गेले याचा शोध घेत होतो तर अटक केली गेली यांचा काय गुन्हा होता का अटक केली अवकाळी पाऊस झाला होता म्हणून पत्रकार परिषद घेतली दुसऱ्याच्या घरात दोन्ही भांडी करायला गेलेले हे नालायक आहे हा शब्द त्यांना लागला त्यांना काय करायचं त्यांनी यावर करावे
तसेच , “मी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे न्या. पंचनामे आधीचे आणि आत्ताचे कधी केले ते पाहा. हा घोटाळा आहे का? याची मला शंका येत आहे. सरकारनं मोठे पैसे विमा कंपन्यांना दिले आहे. हा पैसा कोणाच्या खिशात गेलाय? शेतकऱ्यांना पीक विमा दिला त्याबद्दल त्यांना कितीचे पैसे मिळतायत? कर्जमुक्ती मी केलेली तेव्हाचे तुम्ही साक्ष आहात. सरसकट नुकसान भरपाई द्या. किंवा पुन्हा कर्जमुक्ती द्या. सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
” आचारसंहिता लागेल आणि भाजपचे लोकं तुम्हाला आश्वासने देतील. गॅसचे दर निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पुन्हा वाढले आहेत. शेतकरी म्हणून तुम्ही देखील उभे राहा. ही जाणीव नसेल तर ती ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आत्महत्येचा विचार करु नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.