मुंबई : काका पुतळ्यामध्ये पुन्हा एक नवीन वाद सुरू झाला आहे. नुकताच शरद पवार Sharad Pawar यांनी 2004 साली घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, ” 2004 मध्ये फार विचारपूर्वक निर्णय घेतला होता. तेव्हा अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ते फार नवखे होते. मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही नवखा नेता नको तर छगन भुजबळ Chagan Bhujbal यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले असता पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती घेऊन काँग्रेसकडे Congres मुख्यमंत्री पद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ” असं शरद पवार म्हणाले.
यावर अजित पवारांनी देखील काकांना लक्ष करत 2004 च्या त्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, ” शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं. माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही. 2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल. ” असे अजित पवार म्हणले आहेत.
https://www.facebook.com/share/v/ZfJdFUTkPf9o8vow/?mibextid=w8EBqM