Mumbai News : मुंबईला मायानगरी म्हणतात. या शहरात देशभरातून लाखो लोक स्वत:चे नशीब चमकवण्यासाठी येत असतात. इथे लोकं स्वप्नच नाही तर जगासमोर स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येतात. आर्थिकदृषट्या मजबून होण्यासाठी मुंबई एकमेव चांगलं व्यासपीठ आहे असं देखील मानलं जातं. इथे प्रयत्नांना यश मिळतं असं देखील म्हटलं जातं. लोक म्हणूनच मोठ्या संख्येनं मुंबईच्या सावलीत स्वत:च्या स्वप्नांच्या बीया रोवतात. पण सध्या स्थलांतर करणाऱ्याची संख्या वाढत असताना मिळालेल्या अहवालानुसार आता मुंबईत लोकं कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai News 60 percent of mumbaikars planning to leave the city)
मुंबई सोडण्यामागचं नेमकं कारण काय?
मुंबई सारख्या शहरात सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. या लाईफस्टाईलची मुंबईकरांना चांगलीच सवय झाली आहे. पण सामान्य आयुष्यात लोकांना वेगवेगळ्या अडचणींना ही सामोरं जावं लागतंय हे विसरुन चालणार नाही. सध्या मुंबईत बदलणारं हवामान, राजकीय वादळं आणि बेरोजगारी ही मुंबईतील नागरिक स्थलांतरीत होण्याची प्रमुख कारणं समोर येत आहेत. एका सर्व्हेक्षणात असं आढळलं की, मुंबईतून दर १० पैकी नागरिकांमागे ६ नागरिक शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या विचारात आहे. हे चित्र फक्त मुंबईचे नसून तर दिल्लीतही अशीच काहीशी अवस्था आहे.
धावपळीच्या जगात मुंबईतल्या नागरिकांना स्वत:साठी वेळच मिळत नसल्याचे समोर येत आहे. सकाळची धावपळ, व्यायामासाठी फिरवलेली पाठ, वातावरणात बदल, आजार, चुकीच्या खाण्याच्या सवयी, दररोज येणारं नैराश्य, मोबाईलचे व्यसन आणि इंटरनेटचे फसवं जग या सगळ्यांचा नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. चर्चा आणि सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत.
हे ही वाचा – Rahul Dravid : BCCI ची मोठी घोषणा! राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा हेड कोच
स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेक आजार डोकं वर काढू लागले आहेत. हिवाळ्यामध्ये श्वसनविकारांमध्ये वाढ पाहायला मिळते तर अवकाळी पावसाचं ही चित्र आपल्याला इथेच पाहायला मिळतं. आजारांमध्ये वाढ झाल्या कारणाने नागरिक आता निरोगी जगण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईने देशातील अनेक नागरिकांना आसरा दिला. पण, अनेकांनाच आसरा देणाऱ्या या शहरातील वाढती गर्दी, सुविधांवर येणारा ताण आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी या कारणांकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही.