पुणे : पोर्शे कार अपघात झाला या अपघातामध्ये दोन तरुणांनी आपले जीव गमावले. त्यानंतर प्रचंड प्रयासाने बिल्डर सुपुत्रांच्या आणि आजोबा आणि वडिलांच्या देखील मुस्क्या आवळल्या गेल्या. हे प्रकरण शांत होत नाही तर पुण्यामध्ये हुल्लडबाजांची Reel संख्या देखील कमी होत नाहीये.
पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. एका युवतीने हे रील केलेलं दिसून येतं आहे. मोटरसायकल चालवत असताना ही युवती दोन्हीही पाय एका बाजूने घेऊन गाडी चालवते आहे. रस्त्यावर फार रहदारी नसली तरी हा रस्ता वाहतुकीचा दिसत आहे. दरम्यान रील बनवण्याच्या नादात या युवतीने असा धक्कादायक स्टंट केला आहे. यामुळे ही युवती स्वतःसह दुसऱ्याचा जीव देखील धोक्यात घालू शकते यात शंका नाही.
सोशल मीडियावर सध्या हि रील व्हायरल होत असून एक्स युजर निलेश बुधावले यांनी ही रील शेअर करून यांच्यावर वेळीच कारवाई केली जाईल. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Nagpur Accident : नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं; बालकासह एका जणाचा मृत्यू, सात गंभीर जखमी, वातावरण पुन्हा तापणार