पालकत्व टिप्स : छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच एका पंधरा वर्षीय मुलींन शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही एकच घटना नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळा- कॉलेजमधील रॅगिंग, मित्र-मैत्रिणींमधील वादविवाद, गुणपत्रिकेतील आकड्यांची चढाओढ अशा अनेक कारणांमुळे आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तुम्ही जर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक आहात तर हे प्रश्न स्वतःला विचारायलाच हवेत !
- तुमचा तुमच्या मुलांसोबत रोज संवाद होतो का ?
- हा संवाद पालक आणि पाल्य असा असतो की मैत्रीपूर्ण असतो ?
- तुमचे पाल्य त्याच्या आयुष्यातील खास मैत्री बाबत तुमच्याकडे व्यक्त होऊ शकतात का ?
- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कोणतही लहान मोठं संकट आल्यानंतर ते तुमच्याकडे सल्ला मागायला स्वतःहून सर्वात आधी येतात का ?
- तुमच्या मुलांचं काहीतरी बिनसल असले हे समजून येण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का ?
- तुमच्या पाल्याचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ? त्यांच्या सवयी कशा आहेत ? याची माहिती तुम्हाला आहे का ?
- मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यासाठी बऱ्याच वेळा पालक देखील जबाबदार असतात. त्यामुळे योग्य वेळी तुम्ही एखादी गोष्ट ही तुझ्यासाठी चांगली नाही हे समजावून/ ठणकावून सांगू शकता का ?
नुकतंच ताज असं पोर्शे कारने झालेलं अपघात प्रकरण देखील अशीच एक बाजू आहे. आई-वडिल आपल्या मुलांसाठी हा पैसा उभा करत असतात. परंतु चांगल्या वाईटची शिकवण देखील सोबतीने द्यावी लागते. मुलांना संस्कार, चांगुलपणा हा देखील शिकवण आवश्यक असतं. त्यासाठी सर्वात आवश्यक आहे तो म्हणजे संवाद. या प्रश्नांची उत्तरं जर तुमची नकारार्थी असतील तर आजच मुलांची आपुलकीने संवाद साधायला सुरुवात करा.
लक्षात ठेवा प्रत्येक पिढी-दर-पिढी मानसिक, वैचारिक, शैक्षणिक, वातावरण आणि समाजातील स्पर्धा यात प्रचंड बदल होत राहतो. तुम्ही जे बदल तुमच्या तारुण्यात पाहिले त्यापेक्षा काही पटींनी आत्ताचा काळ बदलला आहे. आणि तो बदलत राहणार ! त्या बदलांसोबत काळाशी एकरूप होऊन प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी बदलत राहणं आवश्यक आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा; शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने घेतला गळफास