देशात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का साजरा केला जातो ?
नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण त्यावेळी धान्य घरात येते. सृजन शक्ती आणि नऊ अंक यांचं साम्य आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. तसेच जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.”