World Autism Awareness Day 2024 : दरवर्षी २ एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागृती दिन World Autism Awareness Day 2024 म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना या समस्येची जाणीव करून देणे हा आहे. ज्याची सुरुवात २००८ साली झाली. ऑटिस्टिक मुले सामान्य मुलांपेक्षा थोडी वेगळी असतात, त्यामुळे त्यांना हाताळण्याची पद्धतही वेगळी असते.
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर Autism spectrum disorder ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. हे वयाच्या 2 किंवा 3 व्या वर्षी आढळते. ऑटिझमग्रस्त मुलांना सामाजिक संवादाचा अभाव, बोलणे, लिहिणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
ऑटिस्टिक मुलांच्या क्षमता आणि गरजा वेगवेगळ्या असतात. या मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ही मुले सामान्य मुलांप्रमाणे आपले विचार, भावना व्यक्त करू शकत नाहीत. काही वेळा त्यांच्यावर बोलण्यासाठी दबाव आणला जातो. त्यामुळे त्यांना राग येतो. येथे पालकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.
ऑटिस्टिक मुलाच्या रागाची ही असू शकतात कारणे
- जेव्हा मूल आपले शब्द आणि भावना इतरांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तेव्हा यामुळे त्याला राग येऊ शकतो.
- ऑटिस्टिक मुले जर ठरलेली दिनचर्या पाळत असतील तर त्यात कोणताही बदल केल्यास त्यांना राग येऊ शकतो.
- अनेकदा मुले ऑटिझम तसेच एडीएचडीला बळी पडतात. ज्यामध्ये मुले अतिसक्रिय असतात, तर त्यांच्या क्रियाकलापांमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध त्यांच्या रागाचे कारण बनू शकतात.
- जेव्हा मुलांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो, तेव्हा त्यांना रागही येतो.
रागावलेल्या मुलांना असे हँडल
- नेमकं कारण ओळखा मूल कशामुळे रागावते हे ओळखण्याचा प्रयत्न करा, तरच आपण त्यांना शांत करण्याचे मार्ग शोधू शकाल. मोठा आवाज, शिवीगाळ, जबरदस्ती, दिनचर्येत होणारे बदल यावर लक्ष ठेवा.
- सोपे शब्द वापरा मुलांना समजावून सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी नेहमी सोप्या आणि सर्जनशील पद्धतींचा वापर करा. यामुळे तुम्ही त्यांना सर्वात मोठी गोष्ट सहज समजावून सांगू शकता. ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत, हे अधिक महत्वाचे ठरते. यामध्ये तुम्ही कोडी किंवा इतर कोणत्याही गेम्सची ही मदत घेऊ शकता.
- कौतुक करा ऑटिस्टिक मुलांचा राग शांत करण्यासाठी तुम्ही जी काही पद्धत अवलंबली आहे, ती जर मूल पाळत असेल तर त्याला त्याच्या कर्तृत्वाची थाप नक्की द्या. त्यामुळे त्याचे मनोबल वाढते.