मुंबई : सकाळी उठल्यानंतर सर्वसामान्य माणूस हा त्याची दिनचर्या ही अगदी सहज करत असतो. अगदी श्वास घेणे ही प्रक्रिया तर त्याच्या इतकी नकळत होत असते की त्याची किंमत त्याला समजत नाही. पण प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशींचा VIDYADHAR JOSHI मृत्यूच्या दारातून परत येतानाचा हा प्रवास ऐकाल तर थक्क व्हाल, ते सांगतात की अगदी ब्रश करण्यापासून ते टॉयलेटला जाताना देखील त्यांना सोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावा लागत होता…
‘मित्रम्हणे’ या युट्युब चॅनेलला सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी आपल्या या कठीण आजाराबाबत आणि आयुष्यातल्या त्या कठीण काळाबाबत सांगितल आहे. विद्याधर जोशी यांना आपण आजपर्यंत अनेक चित्रपट आणि विशेष करून मालिकांमध्ये पाहिल आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्याने खूप नाव कमावलं पण या शर्यतीमध्ये आपल्याला साधे जिने चढताना धाप लागते याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. जेव्हा त्रास जास्त वाढू लागला तेव्हा डॉक्टरांची भेट घेतली आणि तपासानंतर समजलं की त्यांना लंग फायब्रोसिस झाला आहे. तेव्हा त्यांची 13% फुफ्फुसत काम करत नव्हती आणि याहून धक्कादायक होतं ते म्हणजे या आजारावर कोणतही औषध नाहीये. म्हणजे हा आजार कधीही बरा होऊ शकत नाही. या रिपोर्टमुळे देखील कदाचित या कुटुंबाला मोठा धक्का बसला असणार…
त्यांच्या थक्क करणाऱ्या या कठीण काळातील प्रवासातला हा पहिला टप्पा होता. त्यानंतर त्यांना काही औषध सुरू करण्यात आली. हे औषध आजार थांबवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी देता येत नव्हती. हा आजार केवळ हळूहळू वाढेल अशी होती. औषध सुरू होती, पण फुफ्फुस हळूहळू का होईना साथ देणं कमी करत होती. अवघ्या महिन्याभरातच त्यांचं 43% फुफ्फुस काम करणं बंद झालं आणि डॉक्टरांनी थेट फुफ्फुस ट्रान्सप्लांटचा पर्याय त्यांना दिला.
तेव्हा अशी परिस्थिती होती की विद्याधर जोशी सांगतात, त्यांना ब्रश करताना देखील धाप लागायची, टॉयलेटला जाण्यासाठी देखील त्यांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन जावा लागायचा. या सर्व संकटातून थोडंसं मन वळवावं म्हणून त्यांनी घरात वर्षाअखेरची पार्टी करण्याचा प्लॅन केला. पण त्याच रात्री त्यांना जास्त त्रास जाणवू लागला आणि त्यांच्या पत्नीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी समजलं की त्यांचं आता 83% फुफ्फुस निकामी झाल्या आता पर्याय फक्त ट्रान्सप्लांटचाच होता त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवलं गेलं.
दोनच पर्याय त्या डॉक्टरांनी सांगितले होते. त्यातला पहिला पर्याय होता की व्हेंटिलेटर काढून त्यांना शांतपणे मरू द्यावं, नाही तर फुफ्फुस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणे, जी अत्यंत खर्चिक होती. पण त्यांच्या पत्नीने धीर धरून शस्त्रक्रिया करवण्याचाच निर्णय घेतला आणि विद्याधर जोशी यांच्या इच्छाशक्तीने आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या साथीने त्यांना डोनर मिळाला. त्यांच्यावर अत्यंत किचकट अशी संपूर्ण छाती फोडून केली जाणारी शस्त्रक्रिया पार पडली. विद्याधर जोशी सांगतात की 24 तास या शस्त्रक्रियेला लागले होते. त्यानंतर 72 तास त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात आलं. हा संपूर्ण घटनाक्रम सांगताना एक गोष्ट लक्षात येते की माणूस सहजपणे श्वास घेऊ शकत असेल, सहजपणे हे जग पाहू शकत असेल, फिरू शकत असेल, त्याच्या सर्व गरजा स्वतः पूर्ण करू शकत असेल तर तो सर्वात नशीबवान माणूस म्हणावा लागेल. आज विद्याधर जोशी यांची तब्येत चांगली आहे. याच श्रेय त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिल आहे.