पुणे : पुण्यामध्ये सध्या प्रत्येकाच्या चर्चेमध्ये विषय आहे तो म्हणजे पोर्शे कारने Porshe Car Accident झालेल्या अपघात ! या अपघातामध्ये ससून रुग्णालयातून देखील मोठे फेरफार झाले ही एक अत्यंत धक्कादायक बाब असून आज ससूनचे डीन विनायक काळे Dean of Sassoon Vinayak Kale यांनी पत्रकार परिषद घेऊन या तीनही कर्मचाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
ससूनचे डीन विनायक काळे यांनी सांगितले की, पोर्शे अपघात प्रकरणातील रक्ताचे नमुने फेरफार करण्यात आढळून आलेले डॉक्टर अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख पद काढून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर अतुल घटकांबळे या शिपायाचे निलंबन करण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीहरी हळनोर यास तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. 28 तारखेला त्याची सेवा समाप्त करण्यात आली असल्याची माहिती विनायक काळे यांनी आज दिली आहे.
डीन विनायका काळे म्हणाले की, ” रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने फेरफार करणं चुकीचं आहे. या संदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडून विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे. कालच्या चौकशी समिती सोबत मी नव्हतो. ससून मधील एकूण तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ” असे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विनायक काळे म्हणाले आहेत.