पुणे : पुण्यातील विशाल अग्रवाल या बिल्डरच्या चिरंजीवांनी केलेल्या अपघातानंतर Accident Case हे प्रकरण अद्याप देखील तापलेलेच आहे. ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवसापासून रोजच या प्रकरणात नवीन वेगवेगळे मुद्दे उचलले जात असताना आता गाडी अगरवालचा मुलगा नाही तर ड्रायव्हर चालवत होता असा मोठा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल याची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे. दरम्यान जेव्हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये वेदांतचे दोन मित्र आणि ड्रायव्हर होता आणि गाडी फॅमिली ड्रायव्हर चालवत होता असं चौकशीमध्ये विशाल अग्रवाल यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे असाच जबाब वेदांत त्याचे दोन्ही मित्र आणि ड्रायव्हरने देखील दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये फिल्मी ट्विस्ट पाहायला मिळतोय.
पुढे काय होणार
विशाल अगरवाल, वेदांत अगरवाल त्याचे दोन मित्र आणि फॅमिली ड्रायव्हर यांनी दिलेल्या या जबाबानंतर आता पोलीस त्या रात्रीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासत आहेत. जेणेकरून नक्की गाडी कोण चालवत होतं हे निष्पन्न होऊ शकत. तर आरटीओने देखील मोठी कारवाई केली असून वेदांत अग्रवाल याला आता वयाच्या 25 वर्षापर्यंत गाडी चालवण्यासाठी लायसन्स मिळू शकणार नाही. त्याचबरोबर ज्या गाडीचा अपघात झाला आहे त्या गाडीचं रजिस्ट्रेशन बारा महिन्यांसाठी रद्द करण्यात आल आहे. पोलीस आता रस्ते त्याचबरोबर ज्या पबमध्ये वेदांत अगरवाल आणि त्याचे मित्र त्या रात्री गेले होते त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासात असून नेमकं गाडी कोण चालवत होतं हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.