पुणे : पुण्यातील अपघात PUNE ACCIDENT प्रकरणावर राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलीवूड स्टार्स यांच्यासह सामान्य पुणेकर देखील संपत आहे. आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जावी अशीच सर्वांची भूमिका आहे. यात आता आमदार रवींद्र धंगेकर MLA Ravindra Dhangekar यांनी सुरुवातीपासूनच या अपघात प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. तर आता थेट पोलीस आयुक्तांवरच गंभीर आरोप लावले आहेत.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विशाल अगरवाल प्रकरणी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार Police Commissioner Amitesh Kumar यांनाच दोषी धरले आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की,” राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस Home Minister Devendra Fadnavisयांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…?
असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.दिवस १ला – मुंढवा पोलीस स्टेशन
हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.
सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.
आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.
पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.
जय हिंद ,जय पुणेकर..!
पोलीस आयुक्तांसह रवींद्र धंगेकर यांनी मुंडवा पोलीस स्टेशन मधील कॉन्स्टेबल आणि कर्मचारी यांच्यावर देखील गंभीर आरोप लावले असून कॉन्स्टेबल्स सर्व पब्ज आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करतात असा थेट आरोप केला आहे.
दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी वेदांत अग्रवाल याचा पब मधील एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान पुढच्या 48 तासात तातडीने या पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करण्यात यावी अन्यथा इतर व्हिडिओ पोस्ट करण्यात येतील असा इशारा देखील धंगेकर यांनी दिला आहे. त्यामुळे नेमके कोणते व्हिडिओ आता धंगेकर यांच्याजवळ आहेत अशी चर्चा जोर धरते आहे.
https://www.facebook.com/share/v/QTsg3uP8NKPDCF2k/?mibextid=qi2Omg