पुणे : वेदांत अग्रवाल या अल्पवयीन आरोपीने पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघा तरुणांना चिरडले Pune Accident Case होते. या अपघाताची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. परंतु जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर अजित पवार Ajit Pawar यांनी भाष्य करण्याचं टाळलं. पालकमंत्री असून देखील त्यांनी या अपघातावर चकार शब्द काढले नाहीत. यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damaniya यांनी अजित पवारांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, ” अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते. खरंतर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता . पण इकड तिकडच्या गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडेसे बोलले . ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं तेथे झाले नाही तर ते विरोधी पक्षावर देखील भडकतात. त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते. जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले. कालचा त्यांचा जो तोरा होता त्यावरून मला असं वाटतं ते धादांत खोटे बोलत आहे त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.” अशी थेट मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
या अपघातानंतर पुण्याच्या नाईट लाईफचा काळा चेहरा देखील समोर आला. या घटनेतील अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा देखील हे प्रकरण थोपवण्यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. यावरून देखील अंजनी दमानिया यांनी अजित पवारांना थेट सवाल केले आहेत. यावर आता अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.