आयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि जणू या शहराला पुन्हा एकदा जिवंतपण आले आहे. प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून आणि अगदी देशाबाहेरून देखील भक्त आयोध्याकडे येत आहेत. सध्या लाखोच्या संख्येने आयोध्यामध्ये भाविक भक्त दर्शनासाठी जात असताना एक वेगळीच घटना उघडकीस आली आहे.
असं म्हटलं जातंय की, संबंधित ज्या रेस्टॉरंटवर विकास प्राधिकरणने कारवाई केली आहे ते रेस्टॉरंट मंदिरापासून अगदी तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आहे. या रेस्टॉरंटचे नाव आहे शबरी रसोई…, तर झालं असं की या शबरी रसोईमध्ये एक ग्राहक चहा घेण्यासाठी गेले असता त्यांना एका चहाचे बिल 55 रुपये आणि एका टोस्टचे बिल 65 रुपये लावण्यात आले. याबाबत शबरी रसोईचे मालक यांना ग्राहकाने या दराबद्दल विचारणा केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले. हे प्रकरण आता आयोध्या विकास प्राधिकरणाने हाताळण्यास घेतले असून शबरी रसोईला नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
Election Commission : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला रणधुमाळी ; ‘या’ प्रमुख नेत्यांचे भविष्य ठरणार