मुंबई : विमानतळावरील प्रवाशांचा जेवण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Video Viral झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल मध्यरात्री मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) 16 जानेवारी 2024 रोजी पहाटे इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली. या दोन्ही नोटिस प्रकरणी एमओसीएने १६ जानेवारीला म्हणजेच आज उत्तर मागितले आहे. विहित मुदतीत उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह अंमलबजावणीची कारवाई करण्यात येणार आहे.
फ्लाईट होती 12 तास लेट म्हणून रनवे जवळच प्रवासी बसले जेवायला
मुंबई विमानतळावर हा अजब प्रकार घडला आहे. फ्लाईट अज्ञात कारणाने तब्बल १२ तास लेट होती. यामुळे सर्वच प्रवासी खूप संतापले होते. तसेच एका प्रवाशाने पायलटला थेट मारहाण देखील केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
दरम्यान हे सर्व प्रवासी रन वेच्या अगदी जवळच जेवायला बसले होते. या सर्व प्रकारचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.