नई दिल्ली : ‘आदिपुरुष’ Adipurush नंतर प्रभास Prabhas पुन्हा एकदा ‘सालार’ Salar या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या ‘सालार’ या चित्रपटाची भारतातच नव्हे तर परदेशातही प्रतीक्षा आहे. 22 डिसेंबरला ‘डंकी’ला या चित्रपटाची आगाऊ बुकिंग तिकिटे विकली जात असून पहिल्या दिवसाचे शो जवळपास बुक झाले आहेत.
या चित्रपटात प्रभाससोबत मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर श्रुती हासन रिबेल स्टारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘सालार’चा पहिला ट्रेलर जेव्हा प्रेक्षकांसमोर आला तेव्हा प्रभासला त्यात स्क्रीन स्पेस कमी असल्याने लोक थोडे निराश झाले होते. मात्र, आता निर्मात्यांनी प्रभासच्या चाहत्यांची ही निराशा दूर करत सालारचा ट्रेलर 2 रिलीज केला आहे. KGF सारख्या चित्रपट निर्मात्यांच्या सालारची देखील प्रतीक्षा आहे. श्रुती हसनचा बोल्ड लूक आणि प्रभासच्या जबरदस्त अंदाजाने निर्मात्यांनी या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.