मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख आणि घटक पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच कोणाला किती जागा दिल्या जाव्यात यावर रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेसाठी थेट 23 जागांची लिस्ट काँग्रेस हायकमांड कडे पाठवली आहे.
उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी 23 जागांची लिस्ट काँग्रेस कडे सुपूर्द केली आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी अशोक चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षांमध्ये एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होते आहे.
दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारले गेले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. आणि त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील युतीमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले आणि त्यांच्यासोबत देखील अनेक आमदार सत्ताधाऱ्यांच्या गोठात जाऊन बसले आहेत.
दरम्यान आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस हा जुना आणि मोठा पक्ष आहे. त्यानुसार काँग्रेस हाय कमांडकडे जागांची मागणी करण्यासाठी संजय राऊत यांनी तब्बल 23 जागांची लिस्ट पोहोचवली आहे. यावर संजय निरुपण यांनी देखील आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागा मागितल्या. वंचित बहुजन आघाडीने 12 जागा मागितल्या आहेत. एवढ्या जागा जर या पक्षांना दिल्या गेल्या. तर इतरांना काय मिळणार ? आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या. असा थेट टोला देखील संजय निरूपण यांनी लगावला आहे. याच कारणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी काँग्रेसने फेटाळून लावली आहे.
दरम्यान शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच कोणाला किती जागा मिळू शकतात यावर अंदाज येऊ शकेल.