नंदुरबार : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे नंदुरबार Nandurbar लोकसभा मतदारसंघाचा निकाल Lok Sabha Election Results जाहीर करण्यात आला असून काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे के.सी. पाडवी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान या लढतीमध्ये ऍड. गोवाल पाडवी यांनी बाजी मारली आहे.
यंदा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तब्बल ७०.६८ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये अक्कलकुवा – 75.01 टक्के,शहादा – 71.49 टक्के,नंदुरबार – 66.67 टक्के,नवापूर – 80.18 टक्के,साक्री – 67.60, शिरपूर – 65.05 मतदान झाले असून या पंचवार्षिक मध्ये 2% मतदान वाढले आहे.