Byju’s Crisis : बायजूला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशातच एडटेक जायंटचे सीईओ बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की, कंपनी लवकरच कमबॅक करेल आणि लवकरच सर्व काही ठीक केले जाईल.
बायजू कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड गोंधळ सुरू आहे. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत. अशा परिस्थितीत एडटेक कंपनी बायजूचे सह-संस्थापक बायजू रवींद्रन यांनी आज टाऊनहॉलला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, कंपनी संकटातून जात असली तरी आम्ही पुन्हा कमबॅक करू. लवकरच कंपनी पूर्वीसारखी स्थितीत येईल. बायजू रवींद्रन यांनी मान्य केले की, सध्या बायजू कंपनीसाठी कठीण काळ आहे. हे वर्ष कंपनीसाठी खूप कठीण गेले. ते म्हणाले की, कंपनी जवळजवळ 12 महिन्यांपासून संघर्ष करत आहे.
बायजू कंपनी संकटाचा सामना करत आहे
बायजूचे काही इन्वेस्टर्स बायजूचे सह-संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याकडून कंपनीचा कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांच्या या प्रयत्नांना रोखण्यासाठी, रवींद्रन $ 1 अब्ज उभारण्यासाठी इन्वेस्टर्सशी चर्चा करत आहेत. बायजूच्या स्टार्टअपची किंमत एकेकाळी $22 अब्ज होती, आज त्याचा दर चांगलाच जमिनीवर आलांय. कंपनीने आपले आर्थिक निकाल आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी मुदतही संपवलीये.
डेलॉइटने कंपनीचे ऑडिटर पद सोडले
गेल्या आठवड्यात, कंपनीच्या तीन जागतिक इन्वेस्टर्सने सांगितले की, त्यांच्या एजेंट्सने राजीनामा दिला आहे, तर 2021-22 चे आर्थिक तपशील डेलॉइटला उपलब्ध न केल्यामुळे त्यांनी कंपनीचे ऑडिटर पद सोडले. आज टाऊनहॉलमध्ये सीईओ म्हणाले की, कंपनीला भूतकाळात अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याशी लढा देत आम्ही पुढे गेलो आणि यशस्वी झालो. त्यांनी कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत एकत्रित यायला सांगितले.