पुणे : पुण्यातील हाय प्रोफाईल एक्सीडेंटच्या Pune Accident प्रकरणानंतर वेदांत अगरवालVedanta Agarwal, विशाल आगरवाल Vishal Agarwal हे दोघेही संकटात असतानाच आता वेदांतचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल Surendra Kumar Agarwal यांच्यावर देखील गुन्हा दाखल Case filed करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय
अपघात झाला त्या रात्री पोर्शे कारमध्ये चार जण होते. यामध्ये वेदांत आणि त्याचे दोन मित्र त्यासह ड्रायव्हर देखील होता. दरम्यान ही कार वेदांत चालवत होता. परंतु हे प्रकरण शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी गाडी वेदांत नाही तर कुटुंबाचा ड्रायव्हर चालवत होता असं वदवून घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने प्रयत्न केले आहेत. तक्रार दाखल केली आहे ती गंगाधर पुजारी यांनी, गंगाधर पुजारी हेच अग्रवाल कुटुंबाचे ड्रायव्हर आहेत.
गंगाधर पुजारी यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की, माझ्यावर खोटं सांगण्यासाठी दबाव आणण्यात आला. विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी तूच गाडी चालवत होता असं सांग. एक गिफ्ट देतो असं सांगितलं होतं. यावेळी घरात डांबून ठेवून माझा मोबाईल देखील काढून घेण्यात आला. अशी तक्रार दिली आहे. त्यानंतर एकंदरीतच अगरवाल कुटुंबीय प्रकरण दाबण्यासाठी खोटे पुरावे उत्पन्न करत असल्याचा आरोप विशाल अगरवाल यांच्यावर करण्यात आलाच होता. यामध्ये आता वेदांत अगरवाल याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल वय वर्ष 74 यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन: येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
गुरनं. व कलम:- 322/2024 भा.दं.वि.कलम 342, 365, 368, 506, 34.
फिर्यादी:- गंगाधर शिवराज हेरीक्रुब वय 42 वर्ष धंदा – चालक रा.पुणे.
आरोपी:-
- सुरेंद्र आगरवाल रा. वडगावशेरी पुणे
- विशाल आगरवाल रा. वडगावशेरी पुणे
- आरोपी अटक दिनांक –:
- दिनांक 25/5/24 रोजी सुरेंद्र अगरवाल रा वडगांव शेरी. अपराध घडला ता. वेळ ठिकाण.:- 19/05/2024 रोजी ते दिनांक 20/05/2024 रोजी दरम्यान
अपराध दाखल ता. व वे.:- दि. 25/05/2024 रोजी 01/43 वाजता
गुन्हयाची थोडक्यात हकीकत :- फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक 19/05/2024 रोजी रात्रौ ते दिनांक 20/05/2024 रोजी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन येथुन मी माझे घरी जात असताना सुरेंद्र आगरवाल सरांनी मला येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मला त्याचेकडे बोलावुन घेवुन धमकी देवुन माझ्या इच्छेविरुध्द त्यांचेकडील बीएमडब्ल्यु गाडीमध्ये बसवुन, ब्राम्हा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात आणुन, सुरेंद्र आगरवाल सर व विशाल आगरवाल सर यांनी आपआपसात संगणमत करुन मला धमकावुन माझा मोबाईल फोन काढुन घेवुन त्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर लपवुन ठेवण्याच्या उददेशाने डांबुन ठेवून धमकाविले कीं त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व “ त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख ”असे म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तपास :- गुन्हे शाखा