पुणे : पुणे अपघात Pune Accident प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आहे. प्रमुख आरोपी वेदांत अगरवाल Vedant Agarwal याचे वडील विशाल अगरवाल Vishal Agarwal याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Judicial custody सुनावली आहे.
विशाल अगरवाल याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. परंतु न्यायालयाने पुणे पोलिसांची ही मागणी फेटाळली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे विशाल अगरवाल आता उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी धाव घेऊ शकतो.
विशाल अगरवाल यांच्यासह इतर सहा आरोपींना देखील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पुणे पोलीस आता विशाल अगरवाल याच्यावर आणखीन दोन गुन्हे दाखल करणार अशी माहिती पोलिसांनी दिली असून यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
PUNE ACCIDENT : पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक; “स्वतः बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार ?” थेट पोलीस आयुक्तांवरच गंभीर आरोप
विशाल अगरवाल यांनी त्याच्या कौटुंबिक ड्रायव्हरला हा अपघात त्याने केला असं पोलिसांना खोटं सांग असं सांगायला लावलं होतं. ही माहिती आता पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाल्याने विशाल अगरवाल याच्यावर आता कलम 201अंतर्गत त्यासह पोर्शे कारची नोंदणी झाली असल्याची खोटी माहिती दिल्याबद्दल कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.