बीड : मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation जरांगे पाटील Jarange Patil यांनी उपोषण करून राज्य सरकारचे धाबे दणाणून सोडले आहे. आरक्षण देत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेणारे जरांगे पाटील यांनी खडतर परिश्रम करून आपली भूमिका राज्य शासनापर्यंत पोहोचवली खरी… यावर आज हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता असतानाच बीडमधून एक बातमी समोर येते आहे. बीडच्या आंबेजोगाईमध्ये सभेदरम्यानच जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचा एक व्हिडिओ समोर येतो आहे.
दरम्यान उपोषण सुरू असताना राज्य शासनाने आरक्षण मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिल्यानंतरच जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं होतं. त्यानंतरही पुरेपूर विश्रांती न घेता त्यांचा सातत्याने महाराष्ट्रभर झंजावाती दौरा सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आतापर्यंत सभा पार पडल्या आहेत. दरम्यान काल बीड मधील आंबेजोगाईमध्ये त्यांची सभा होती. ही सभा सुरू असतानाच भाषण करत असते वेळी त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागले. तरीही त्यांनी भाषण न थांबवता आपलं म्हणणं उपस्थितांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
https://www.facebook.com/manojjarangepatil96k/videos/2257717491100275/
जरांगे पाटील यांना ताप आणि सातत्याने सुरू असणारे दौरे मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. परंतु तरीही सभा होणारच अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान आज हिवाळी अधिवेशनामध्ये काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे.