लवकरच आता लग्न सराईला सुरुवात होणार आहे. पण आजचा विषय हा जरा वेगळा आहे. खरं तर अनेक चित्रपटांमध्ये आपण असा प्रसंग पाहिला असेल. पण आठवणच करून द्यायची झाली तर थ्री इडीयट्स या चित्रपटामध्ये आपण हा प्रसंग पाहिला आहे की, लग्नामध्ये न बोलताच अभिनेत्यांनी जेवणावर ताव मारला त्यावेळी पोलीस आले नाहीत पण जर तुम्ही असं कधी करण्याचा विचार करत असाल तर पोलीस आता येऊ शकतात.
https://www.instagram.com/reel/C1V55O0rOtl/?utm_source=ig_web_copy_link
झालं असं होतं की, उत्तर प्रदेशमध्ये लग्नात न बोलवताच दोघेजण लग्नात उपस्थित राहिले. जेवणावर तावही मारला आणि वर नाचायला देखील सुरुवात केली. पण नेमकं हे दोघेजण कोण आहेत हे वर पक्ष आणि वधु पक्ष दोघांनाही समजेना. आणि मग थेट पाचरण झालं ते पोलिसांना. त्यानंतर या दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली आहे. याविषयी वकील उज्वल त्यागी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये त्यांनी न बोलताच लग्नात जाऊन जेवण करणे हा कशा पद्धतीने गुन्हा आहे हे सांगितले आहे.