केरळ : द केरला स्टोरीज The Kerala Stories हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर अनेक संकटांना तोंड देत अखेर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला देखील जमवला होता. आता लवकरच या चित्रपटाचे प्रदर्शन दूरदर्शनवर होणार आहे.

दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळमध्ये दूरदर्शनवर या चित्रपटाचे प्रदर्शन केले जाऊ नये अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी थेट आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” द केरला स्टोरी सिनेमा प्रोपागंडा विचारांना वाढीस देण्याचं काम करतो आहे. त्यामुळे दूरदर्शनच्या माध्यमातून द केरला स्टोरीजच होत असलेलं प्रसारण निंदनीय आहे. एखाद राष्ट्रीय चॅनल बीजेपी आरएसएसच प्रचारक म्हणून काम करू शकत नाही. सध्या निवडणुकीच्या काळात अशा सिनेमाचं प्रसारण होण चुकीचं आहे. या सिनेमामुळे धार्मिक मतभेद वाढीस लागू शकतात.” या पोस्टमध्ये मुख्यमंत्री पिनाराय यांनी लिहिल आहे.

दरम्यान आज दूरदर्शनवर रात्री आठ वाजता हा चित्रपट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या मागणीनंतर चित्रपटाचे प्रसारण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.