पुणे : प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटावा अशी एक चांगली बातमी समोर येते आहे. भारताने अनेक स्तरावर उत्तुंग यश मिळवले आहे. संशोधकांनी बनवली कोव्हीडची लस असो, मिशन मंगळ असो, क्रीडा किंवा मनोरंजन क्षेत्र असो… भारतीयांनी जगभरात आपली छाप सोडली आहे. आता आणखी एक मोठे यश आपल्या भारतीय शाश्त्रज्ञांनी मिळाले आहे ते म्हणजे मलेरिया वर लस. विशेष म्हणजे मलेरिया रोगावरील भारतीय लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) यादीत सामील करण्यात आलं आहे. मलेरिया वॅक्सिनने जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध 75 चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यानंतर डब्ल्यूएचओने या लसीचा यादीत समावेश केला आहे.
मलेरियावरील या भारतीय लसीचं नाव R21/Matrix-M असं आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी मिळून तयार केली आहे. भारताने 30 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर मलेरियावरील ही लस विकसित केली आहे. R21/Matrix-M ही WHO च्या मलेरिया प्रीक्वालिफाइड यादीत सामील होणारी दुसरी आणि पहिली भारतीय लस आहे.