महाराष्ट्र : यावर्षी उन्हाळ्यात राज्यात अक्षरशः जीवाची काहीली झाली आहे. उष्णतेने एकीकडे सर्वच जण हैराण असताना मान्सूनने Monsoon महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे कुठेतरी वातावरणात एक थंडावा आला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही दिलासादायक बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सूनने आपली हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये मान्सून सक्रिय झाला होताच. कालपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाला धुवाधार सुरुवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावतो आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनने वेळेत महाराष्ट्रात देखील हजेरी लावली. दरम्यान कोकणासाठी हवामान खात्यांन मात्र येलो अलर्ट जारी केला आहे. एकंदरीतच उष्णतेने हैराण झालेल्या बळीराजाला देखील एक दिलासा मिळाला आहे.