आज दिवाळीचा वर्षभरातील सर्वात मोठा सण सुरु झालं आहे. दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर 61200 रुपयांवरून कमी होऊन 60,760 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीत सोन्याचे दर 61,350 वरून 60,910 वर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये आज सोनं 61,750 रुपयांवरून 500 रुपयांनी कमी होऊन 61,250 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलं आहे.
आज मुंबईत प्रति तोळे सोन्याचा दर 440 रुपयांनी कमी झाला असून 60,910 रुपये इतका झाला आहे. बुधवारी मुंबईत सोन्याचा दर 61,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 73,200 रुपये आहे.
पुणे – 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त
नाशिक – 60790 रुपये 440 रुपयांनी स्वस्त
नागपूर – 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त
कोल्हापूर – 60760 रुपये 440 रुपयांनी स्वस्त